10 वी नंतर च्या करिअर संधी- योग्य निवड कशी कराल?

10 वी नंतर च्या करीअर संधी-दहावीचा निकाल लागल्यानंतर अनेक विद्यार्थी आणि पालकांसमोर पुढे काय करावे? कोणती शाखा निवडावी? कशात चांगल्या प्रकारच्या करिअरच्या संधी आहेत? व त्या कोणत्या आहेत? कोणत्या मार्गाने गेल्याने लवकर यश प्राप्त होईल व आपण सेटल होईल? असे अनेक  प्रश्न उभे राहतात. या सर्व प्रश्नांची जास्तीत जास्त काळजी विद्यार्थ्यांपेक्षा त्यांच्या पालकांनाच असते. दहावी नंतरच्या करिअरच्या संधींमध्ये विविध मार्ग उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांनी आपल्या आवडी, क्षमता, आणि भविष्यातील करिअरच्या दृष्टिकोनातून योग्य निर्णय घेणे महत्त्वाचे आहे. याबाबतीत पालकांनी ही वरील बाबीचा विचार करावा इतरांची मुले करतात म्हणून आपल्या पाल्याला करण्यास भाग पाडू नये. खालील काही मार्गदर्शनपर करिअर पर्याय आणि संधींची माहिती दिली आहे. यातून आपल्याला आपल्यासाठी योग्य असा पर्याय निवडता येईल. अशा आहेत 10 वी नंतर च्या करीअर संधी .

 १. विज्ञान शाखा (Science Stream):-

सर्वांनाच वाटते आपला मुलगा आपली मुलगी डॉक्टर किंवा इंजिनियर व्हावी यासाठी विज्ञान शाखा हा एक प्रमुख आणि लोकप्रिय पर्याय आहे. विज्ञान शाखेत दोन उपशाखा आहेत: मेडिकल आणि नॉन-मेडिकल. या दोन्ही शाखेत भरपूर अभ्यासक्रम उपलब्ध आहेत तसेच हे अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर चांगल्या करिता संधी उपलब्ध होऊ शकतात. फक्त हे करत असताना आपल्या पाल्याचा कल आणि त्याची आवड नक्कीच लक्षात घ्यावी.या आहेत विज्ञान शाखेतील  10 वी नंतर च्या करीअर संधी 

  A वैद्यकीय क्षेत्र /मेडिकल :-

  1.एमबीबीएस (MBBS) – डॉक्टर बनण्यासाठी.

  2.बीडीएस (BDS) – दंतवैद्यक (Dentistry) क्षेत्रात.

  3.बीएचएमएस (BHMS):-  होमिओपॅथी क्षेत्रात.

  4.बीएएमएस (BAMS):- आयुर्वेदिक चिकित्सा.

  5.फार्मसी: – औषधनिर्माणशास्त्र (Pharmacy).

  6.नर्सिंग :- परिचारिका (Nursing) प्रशिक्षण.

  7. वैद्यकीय प्रयोगशाळेसंबंधीचे अभ्यासक्रम (DMLT/BMLT)

 

    • नॉन-मेडिकल:-

अशा आहेत 10 वी नंतर च्या करीअर संधी नॉन-मेडिकल क्षेत्रात. 

1.अभियांत्रिकी (Engineering) – विविध शाखा जसे की संगणक, यांत्रिकी, इलेक्ट्रिकल, सिव्हिल.

  2.बीएससी (B.Sc): विविध विज्ञान विषयांमध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र इत्यादी.

  3.कॉम्प्युटर सायन्स:- माहिती तंत्रज्ञान (IT) आणि संगणकशास्त्र (BCS)

  4.एव्हिएशन :- पायलट प्रशिक्षण.

  5. कृषी विषयक पदवी व पदविका ( B.Sc.Agri./Diploma Agri.)

  6. बॅचलर ऑफ कम्प्युटर एप्लीकेशन (BCA)

 २. वाणिज्य शाखा (Commerce Stream):-

वाणिज्य शाखा आर्थिक, व्यवसायिक, आणि व्यवस्थापन विषयांची माहिती देते. या शाखेतही आपणास बऱ्याचशा संधी उपलब्ध आहेत जसे की खालील प्रमाणे आपल्याला सांगता येतील.

1.बीकॉम (B.Com) :- व्यवसायिक अभ्यासक्रम.

2.सीए (CA) :- चार्टर्ड अकाउंटंट बनण्यासाठी.

3.सीएस (CS) :- कंपनी सेक्रेटरी.

4.बीबीए (BBA):- बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन.

5.इकोनॉमिक्स (Economics):- आर्थिक क्षेत्रातील अभ्यास. या आहेत वाणिज्य  शाखेतील  10 वी नंतर च्या करीअर संधी

 ३. कला शाखा (Arts/Humanities Stream):-

बऱ्याच जणांचा असा विश्वास आहे की कला शाखेमध्ये करण्यासारखी काही पण तसे नाही वास्तवात या शाखेतूनही आपल्याला बरंच काही करता येते.कला शाखा विविध सामाजिक आणि मानवीय विषयांमध्ये शिक्षण देते. या आहेत कला  शाखेतील  10 वी नंतर च्या करीअर संधी.

1. कला शाखा पदवी बीए (B.A):- भाषा,साहित्य, इतिहास, भूगोल, समाजशास्त्र, मानसशास्त्र इत्यादी विषय.

2.,पत्रकारिता (Journalism):- पत्रकार बनण्यासाठी.

3.डिझाइन (Design):- फॅशन, इंटीरियर, ग्राफिक डिझाइन.

4.हॉटेल मॅनेजमेंट (Hotel Management):- पर्यटन आणि आतिथ्य क्षेत्रातील करिअर.

5. एलएलबी (LLB):- विधी अभ्यास (Law).

6. शिक्षक होण्यासाठी पदवी व पदविका:-

 ४. व्यावसायिक अभ्यासक्रम (Vocational Courses):-

व्यावसायिक अभ्यासक्रम तांत्रिक आणि व्यावसायिक कौशल्ये विकसित करण्यासाठी. या आहेत इतर  10 वी नंतर च्या करीअर संधी

1.आयटीआय (ITI): -तांत्रिक प्रशिक्षण संस्थांमध्ये.

2.डिप्लोमा कोर्सेस:- विविध तांत्रिक आणि व्यावसायिक क्षेत्रांमध्ये.

3.फॅशन डिझाइनिंग: – फॅशन क्षेत्रात करिअर.

4.ऍनिमेशन आणि मल्टिमीडिया :- डिजिटल कला आणि ऍनिमेशन.

 ५. स्वयंरोजगार आणि उद्योजकता (Self-Employment and Entrepreneurship):-

जर काही जणांना पुढील शिक्षण घेण्यामध्ये रस नसेल तर स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची आवड असणाऱ्यांसाठी हा एक उत्तम पर्याय आहे. या हि क्षेत्रात  10 वी नंतर च्या करीअर संधी आहेत.

1.स्टार्टअप्स (Startups):- नवीन व्यवसाय उभारणे.

2.फ्रीलान्सिंग (Freelancing):- डिजिटल मार्केटिंग, कंटेंट रायटिंग, ग्राफिक डिझाइन.

3.कौशल्य आधारित व्यवसाय:- बेकरी, हस्तकला, चित्रकला इत्यादी.

 ६. सरकारी नोकऱ्या (Government Jobs):-

जर घरची परिस्थिती बेताची असेल तर आपल्याला दहावी नंतरही काही सरकारी नोकऱ्या उपलब्ध आहेत ज्यासाठी स्पर्धा परीक्षांची तयारी करावी लागते. याद्वारे आपण सरकारी नोकरी प्राप्त करू शकतो पण त्यासाठी स्पर्धा परीक्षेत यशस्वी होणे गरजेचे आहे. हा हि एक पर्याय   10 वी नंतर च्या करीअर संधी मध्ये आहे.लवकर स्थिर होण्यासाठी .

1.एसएससी (SSC):- स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदे.

2.रेल्वे :- विविध तांत्रिक आणि गैरतांत्रिक पदे. जसे की ट्रॅकमन, गॅंगमन व विविध ग्रुप डी ची पदे.

3.आर्मी:- भारतीय सैन्यात विविध पदे. सैन्यातही अशीच ग्रुप डी ची अनेक पदे आहेत जे दहावी पास या पात्रतेवर भरली जातात.

वर उल्लेख केलेल्या प्रत्येक अभ्यासक्रमाविषयी विस्तृत माहिती ही आपल्याला GOOGLE द्वारे प्राप्त होऊ शकते आपण फक्त आपल्याला आवडणाऱ्या अभ्यासक्रमाविषयी सर्च बॉक्समध्ये सर्च करायचे आहे. यात सर्व माहिती व उपलब्ध असलेल्या महाविद्यालयांची लागणाऱ्या शैक्षणिक फी शिष्यवृत्ती सर्वच माहिती आपल्याला उपलब्ध होईल.

NEP 2020 नुसार २०२२४-२०२५ या शैक्षणिक वर्षापासून काही नवीन बदल महाराष्ट्र राज्यात अभ्यासक्रमआराखड्यात करण्यात येणार आहेत(२०२४-२०२५ मध्ये पूर्वप्राथमिक इयत्ता साठी पुस्तके आली आहेत ) या नुसार वरील अभ्याक्रमात देखील बदल होत आहेत. ते आपण पुढील लेखात पाहू.

सर्वच यशस्वी विद्यार्थ्यांना उज्वल भविष्यासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा..

 दहावी नंतरच्या करिअरच्या संधींमध्ये विविध पर्याय उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांनी आपल्या आवडी, क्षमता, आणि भविष्यातील उद्दिष्टांच्या आधारे योग्य निर्णय घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. योग्य मार्गदर्शन आणि योग्य निवड केल्यास भविष्यातील करिअर यशस्वी होऊ शकते.

https://marathi.indiatimes.com/career/career-news/best-courses-after-ssc-10th-pass-for-career/articleshow/7573217

Leave a Comment